TIMES OF AHMEDNAGAR
गुंड विठ्ठल शेलारला शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य मास्टरमाईंड म्हणून पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी या भाईची त्याच्या राहत्या घरापासून धिंड काढलेला फोटो व्हायरल झाला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची राहत्या घरापासूनच पोलिसांनी धिंड काढली आहे. पुनावळेमधून ही धिंड काढण्यात आली होती. शेलार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
५ जानेवारीला मर्डर
शरद मोहोळला संपवण्यासाठी विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे आणि गणेश मारणे यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. पोलीस मुख्य मास्टरमाईंड असलेला तिसरा आरोपी असलेल्या गणेश मारणे याच्या शोधात होते. गुंड शरद मोहोळ याचा मर्डर होण्याआधी एक महिना आधी कट रचला गेला होता.
मामाच्या अपमानाचा बदला
आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी मोहोळला त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी गोळ्या घालून संपवलं. कोथरूडमधील सुतारदरामध्ये राहत्या घराजवळ मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. मोहोळला संपवणाऱ्या मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे याचा मोहोळने अपमान केला होता. पोळेकर याला मामाचा बदला घ्यायचा होता तर दुसरीकडे विठ्ठल शेलारलाही त्याला संपवायचं होतं. सर्वांनी मिळून कट रचला आणि मुन्नाला मोहोळच्या गँगमध्ये पेरलं.
दरम्यान शरद मोहोळच्या मर्डरची आधीपासूनच प्लॅनिंग सुरू होती. साहिल पोळेकर याने बंदूक चालवण्याचा मुळशीमधील हार्डोशी गावामध्ये सराव केला होता. त्यानंतर मोहोळच्या पोरांसोबत जवळीक वाढवली आणि सर्वांचा विश्वास जिंकला. मोहोळला संपवण्याआधी मुन्ना याचं त्याच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. याचा अर्थ असा होतो की त्याने संपूर्ण रेकी केली. ५ जानेवारीला आपल्या साथीदारांसह मोहोळची गोळ्या घालत हत्या केली.
शेलारची बुलेटप्रुफ गाडी जप्त
शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पूनावळेमधील त्याच्या फार्म हाऊसवर ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती. ही गाडी शेलारचे साथीदार दुसऱ्या ठिकाणी हलवणार होते. यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.