मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड निवडणुकीपूर्वी भेटायला आले होते असं सांगितलंय. तसंच (३ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मंत्री  धनंजय मुंडेंन  सोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकी आधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. त्याआधी आठ दिवसांपासून फोन येत होते. रात्री दोन वाजता ते  आले, सोबत वाल्मिक कराड  होता. मी झोपलो होतो ते आत आले. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हार्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. यांच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील - Marathi News |  Maharashtra Assembly Election 2024 : Everyone should decide on one  candidate: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com(संग्रहित दृश्य)

ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला…

महंत नामदेवशास्त्री यांचं जे बोलायचं आहे ते बोलून झालं आहे, या टोळीने दाखवलं किती जातीयवाद असतो. असे जातीयवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे.स्वतः साठी देवधर्म कळेना…. काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला… आता लोक व्यक्त होत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil | Maratha Reservation(संग्रहित दृश्य)

मराठ्यांनाही तुमची लेकरं समजा….

राज्यातील मराठा बांधवांना हातजोडून विनंती आहे. मी समाजासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षण मिळवणारच आहे. जिव्हारी लागेल असं पाऊल उचलू नका. काल बीडमध्ये आणि  सिल्लोडमध्ये आत्महत्या झाली. माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. नंबर गेला तर गेला, अजून शिकू. आरक्षण मिळाल्यावर पुन्हा शिका. पण कायमचं आयुष्य संपवू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मला सरकारला विचारायचंय की तुम्हाला किती बळी पाहिजे ? तुम्हाला काहीच वाटत नाही का ? अरे माणसं मेलीत माणसं , किमान माणसं मेल्यावर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्यावर….. माणसाचं काळीज हवं. तुम्हाला जशी मुलं आहेत, तशी मराठ्यांनाही मुलं आहेत. तुम्ही त्यांनाही तुमची लेकरं समजा. आमचा विनाकारण संयम ढळला तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने भयंकर आंदोलन करावं लागेल, असा संतप्त इशारा  जरांगे यांनी दिला आहे.