By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भारतात मोदी जे करत आले आहेत तेच ट्रम्प अमेरिकेत करत आहेत. मोदींनी देशाला विश्वासात घेतले नाही ट्रम्प टॅरिफवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > भारतात मोदी जे करत आले आहेत तेच ट्रम्प अमेरिकेत करत आहेत. मोदींनी देशाला विश्वासात घेतले नाही ट्रम्प टॅरिफवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल…
देश-विदेश

भारतात मोदी जे करत आले आहेत तेच ट्रम्प अमेरिकेत करत आहेत. मोदींनी देशाला विश्वासात घेतले नाही ट्रम्प टॅरिफवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल…

Last updated: 2025/04/10 at 4:40 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE
TIMES OF NAGAR 

 मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सध्या हेच सुरू आहे. जगावर आपण लादलेल्या टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेचे रोजचे उत्पन्न कसे दोन अब्ज डॉलर्स वाढले असे अर्धसत्य प्रे. ट्रम्प सांगत आहेत. मात्र टॅरिफ युद्धाची झळ पोहोचलेल्या चीनसह इतर देशांनी दिलेल्या ईट का जवाब पत्थरमुळे अमेरिकेचा खर्च किती अब्जांनी वाढला किती संभाव्य उत्पन्नावर अमेरिकेला पाणी सोडावे लागले अमेरिकन उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. विकास दर घटण्याची धोक्याची घंटा… हे सत्य ते अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवत आहेत. कारण ते सांगणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे. भारतात जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आले आहेत. तेच डोनाल़्ड ट्रम्प अमेरिकेत करीत आहेत असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे विचारी राज्यकर्ते म्हणून कधीच परिचित नव्हते. एककल्ली आणि विक्षिप्त राजकारणी असाच त्यांचा बदलौकिक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्याचा अनुभव आला होता. आता दुसऱ्या टर्ममध्ये तर त्यांच्या अविचारी धोरणांनी उच्छाद मांडला आहे. संपूर्ण जगात त्याविरोधात संताप आहे. खुद्द अमेरिकेतही तेथील जनता ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरली. मात्र एवढे सगळे असूनही ट्रम्प महाशय आपल्या आर्थिक धोरणांचे खुले समर्थन करीत आहेत. आपण सुरू केलेल्या टॅरिफ युद्धात अमेरिकेचीच कशी सरशी होत आहे. पूर्वी नव्हता एवढा प्रचंड पैसा कसा अमेरिकन सरकारच्या तिजोरीत येत आहे. अशा वल्गना ते करीत असल्याचे सामना दैनिकातील अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Modi-Trump meeting: India, US announce plans for fresh Quad initiatives, launch bilateral strategic venture | India News - The Indian Express (संग्रहित दृश्य.)

अमेरिकन उद्योग व व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम…

कुठलाही एककल्ली सत्ताधारी त्याचेच धोरण देशासाठी कसे भल्याचे आहे. असे तुणतुणे वाजवीत असतो. या धोरणाचे देशाला भोगावे लागणारे दुष्परिणाम त्यामुळे तेथील आर्थिक व सामाजिक घडी विस्कटण्याचा असलेला धोका एकतर त्यांना मान्य नसतो किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सध्या हेच सुरू आहे. जगावर आपण लादलेल्या टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेचे रोजचे उत्पन्न कसे दोन अब्ज डॉलर्स वाढले असे अर्धसत्य प्रे. ट्रम्प सांगत आहेत असे या अग्रलेखात म्हटले आहे. टॅरिफ युद्धाची झळ पोहोचलेल्या चीनसह इतर देशांनी दिलेल्या ईट का जवाब पत्थरमुळे अमेरिकेचा खर्च किती अब्जांनी वाढला किती संभाव्य उत्पन्नावर अमेरिकेला पाणी सोडावे लागले अमेरिकन उद्योग व व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. विकास दर घटण्याची धोक्याची घंटा… हे सत्य ते अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवत आहेत. कारण ते सांगणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे. भारतात जे पंतप्रधान मोदी करीत आले आहेत तेच प्रे. ट्रम्प अमेरिकेत करीत आहेत. सोयीचे तेवढे बोलायचे आणि गैरसोयीचे झाकून ठेवायचे. त्यावर मौनीबाबा व्हायचे. दोघेही त्याअर्थाने असत्याचे वारसदार आहेत. बहुदा त्यामुळेच मोदी हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र असावेत आणि मोदीही ट्रम्प भारताला देत असलेल्या तडाख्यांबाबत अवाक्षर काढत नसावेत अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी  केली आहे.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article लव्ह मॅरेज केलेल्या बायकोची रात्रीची पोस्ट, मी केस केलीय, तू आता जेलमध्ये जा, ‘बेस्ट ऑफ लक’; बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
Next Article सुहागरात्रीलाच बायको म्हणाली, ‘मैं किसी और की हूं अमानत ; पत्नीने असे काही सांगितले की पतीच्या पायाखालची जमीनच सरकली… हबकलेल्या नवरदेवानं शेवटी..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?