अवघ्या एक वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं रात्री सोशल मीडियात जेलमध्ये जा म्हणत बेस्ट ऑफ लक सुद्धा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येऊन आईला कायमचं झोपी जातो म्हणत २४ वर्षीय नवऱ्यानं घरच्या पंख्याला लटकून आत्महत्या केली. मंगळवारी (दि.८ ) पत्नीने सोशल मीडियात पोस्ट करत लिहिले होते की मी माझ्या पतीविरुद्ध खटला दाखल केला आहे. साडे दहापर्यंत तुरुंगात असेल. बेस्ट ऑफ लक आता तू तुरुंगात जा. यानंतर तिचा पती राज आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल करण्यात आली. राज त्याचे वडील मनीष बाबू आणि आई उर्मिला देवी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. सिमरनचा भाऊ त्याच पोलिस ठाण्यात हवालदार आहे. सिमरनच्या भावाने राज आणि त्याच्या वडिलांना पोलिस ठाण्यात मारहाण केली. राजला रात्रभर लॉक अपमध्ये ठेवण्यात आले. सकाळी राज घरी पोहोचला आणि म्हणाला की, आई मी कायमचा झोपी जाणार आहे. काही वेळातच त्याचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. राजचे वडील सुरेश कुमार यांच्या तक्रारीवरून त्यांची पत्नी, सासू, सासरे, मेहुणे आणि मेहुण्याविरुद्ध छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बरेलीमधील इज्जतनगरमधील मुन्शी नगर कॉलनीत ही घटना घडली.२४ वर्षांचा राज पेटीएममध्ये काम करायचा. तो दुकानांमध्ये पेटीएम स्कॅनर बसवत असे. बहीण पूनमने सांगितले की राज आणि सिमरनचा २१ एप्रिल २०२४ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या एक आठवडा आधी मी सोशल मीडियावर सिमरनचा एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये ती एका तरुणासोबत होती. मी दोघांबद्दल माहिती गोळा केली. त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न होते. मी तो व्हिडिओ भाऊ राजलाही दाखवला पण त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले की तो त्याचा भूतकाळ आहे. आता तसं काही नाही. आता आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी फक्त सिमरनशीच लग्न करेन. राजची इच्छा मान्य करून कुटुंबाने लग्न सिमरनशी लावून दिले.