निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी लावल्या पैंजा, सासुरवाडी जावयाला साथ देणार कि यंत्रणा गड राखणार ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | LOK SABHA ELECTION | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | NILESH LANKA VS SUJAY VIKHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास ११ दिवस झाले तरी देखील निवडणुकीच्या चर्चा काही थांबायला तयार नाहीत.नगर तालुक्यात कोणाला जास्त मताधिक्य मिळेल याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे . तालुक्यात पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार पैंजा देखील रंगल्या आहेत .
स्त्रोत.सोशल मिडिया.
विखेंसाठी कर्डीलेंची धावपळ !
नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागाला असला तरी राजकीयदृष्ट्या तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे . नगर तालुक्यात यंदा उस्फुर्तपणे सरासरी ६६ टक्के मतदान झाले. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्याला पडणार याची गणिते सोडवण्यात सध्या गावोगावचे कार्यकर्ते मग्न आहेत. महायुतीची धुरा माजी.आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांभाळली होती. गावोगावी सभा, बैठका , प्रचारफेऱ्या या माध्यमातून कर्डीलेंनी विखेंना थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मताधिक्य मिळवण्यासाठी कर्डिले यांच्या समर्थकांनी प्रभावी प्रचारयत्रंणा उभी केली होती.
स्त्रोत.सोशल मिडिया.
लंकेंसाठी शिवसैनिक तैनात !
महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे नियोजन करण्यात आले होते. कॉग्रेसचे जेष्ठ नेते संपतराव म्हस्के , राष्ट्रवादीचे रोहिदास कर्डिले , उद्धव दुसुंगे , प्रताप शेळके , संदेश कार्ले , बाळासाहेब हराळ , प्रविण कोकाटे आदि आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक गावात बैठका, प्रचारफेरीचे नियोजन करून लंकेंना मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला . मागील वेळी सुजय विखेंना नगर तालुक्यातून ५३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते . मात्र त्यावेळी शिवसेना -भाजप यांची युती होती. कर्डिले , गाडे यांनी विखे यांच्या पाठिशी ताकद उभी केली होती. यावेळी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढल्याने नगर तालुक्यातील दोन राजकीय ताकदी एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या होत्या. यामुळे तालुक्याचे मैदान कोण जिंकणार, कुणाला किती मताधिक्य मिळणार याची चर्चा व याबाबत कार्यकर्त्यांच्या पैंजा लागल्या आहेत .
स्त्रोत.सोशल मिडिया.
सासुरवाडी जावयाला किती साथ देणार …..
महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील जवळपास ५० गावे येतात . त्यातच नगर तालुक्यातील अरणगाव हि लंके यांची सासुरवाडी व आजोळ आहे . यामुळे सासुरवाडी जावयाला किती साथ देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे .