पाईपलाईन रोडवर त्या तरुणाला बेदम मारहाण, तरुण रुग्णालयात दाखल….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT POLICE, AHMEDNAGAR | BHISTABAGH CRIME NEWS | TOFKHANA POLICE STATION | KARAN ASHOK DAHIJE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मागील भांडणाचा राग मनात धरून युवकावर कोयता आणि रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील सुखकर्ता कॉर्नरवर घडली आहे. करण अशोक दाहिजे (वय २० रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मुलाबाबत सांगितल्याचा राग मनात धरून करणला मारहाण…
करण अशोक दाहिजे यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण बुधवारी दुपारी भिस्तबाग येथून ड्रायक्लीनचे कपडे घेऊन दुचाकीवरून पाईपलाईन रस्त्याने जात असताना दुपारी एकच्या सुमारास सुखकर्ता कॉर्नरजवळ त्यांना तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अडवले. करण तनपुरे याच्या हातात कोयता, सातव व अर्जुन तनपुरे याच्या हातात लोखंडी रॉड व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींकडे लाकडी दांडके होते. त्यांनी करणला मारहाण करून जखमी केले. भांडण सुरू असताना रस्त्यावरील लोक जमा झाल्याने मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी यश सातव याने दारू पिऊन सायंकाळी साडेआठच्या सुमारास करणला शिवीगाळ केली होती. यासंदर्भात करण यांनी यशच्या आई-वडिलांना सांगितले असता त्याच्यावर पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मुलाबाबत सांगितल्याचा राग मनात धरून करणला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.