महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत. मात्र अद्यापहि मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निकालानंतर १२ दिवसांनी शपथ घेतली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार ? याविषयी दावे केले जात असतानाच या मंत्रीमंडळ विस्तारात कोण शपथ घेणार ? याचीही जोरदार चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळत आहे. याद्या तयार झाल्या असून केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केलं होतं. त्यामुळे आता संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे.

devendra fadnavis on ncp and shivsena split ajit pawar eknath shinde news अजित पवार से रिश्ता राजनीतिक है और एकनाथ शिंदे से इमोशनल; भाजपा किसे साध रही, महाराष्ट्र न्यूज़(संग्रहित दृश्य.)

गृहमंत्रालय फडणवीसांकडेच ?

शिवसेना (एकनाथ शिंदे) गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा असून त्यासाठी एकनाथ शिंदे शेवटच्या काही तासांपर्यंत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास संमती देत नव्हते, असेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीसांकडेच गृह खात्यासह अर्थखात्याचाही कारभार असेल अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदेंकडे महसूल खात्यासह नगरविकास खातं जाऊ शकतं, तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण खात्याचा कारभार दिला जाऊ शकतो.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar to hold talks on power-sharing today | Mumbai News - Times of India(संग्रहित दृश्य.)

तिन्ही पक्षात कोणाला मंत्रिपद ?

दरम्यान तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रीपदांच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल,आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व गोपीचंद पडळकर या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर एकनाथ शिंदेंकडून पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये उदय सामंत, शंभुराज देसाई,गुलाबराव पाटील,दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल व योगेश कदम या आमदारांची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. तर अजित पवारांच्या यादीत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक,संग्राम जगताप व इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.