माझ्या मैत्रिणीला मोडेलिंगला का नेले …….एका तरुणाला बेदम मारहाण,पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PUNE POLICE | YOUTH ASSAULTED FOR TAKING YOUNG WOMAN TO MODELLING | CRIMINAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी वार केलेल्या तरुणासह आणखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया
मैत्रिणीला मोड्लिंग साठी नेले म्हणून कोयत्याने वार …..
या प्रकरणी ओम गायकवाड व त्याचे साथीदार आनंद, रोहन, आणि सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे वय १९ रा. लोहियानगर, गंज पेठ असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडेलिंगसाठी नेले होते. या कारणामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता.
मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात पकडले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.