कुस्तीने खेळाडूंना एक नवीन ओळख दिली आहे, त्यामुळे तरुणांनी तालमिकडे वळावे. – ॲडव्होकेट समीर पटेल
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | ADVOCATE SAMEER PATEL | WRESTLING | PAILWAN NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GU
भातोडी येथे नृसिंह यात्रा व चांद शाह वली बाबा यांच्या उरुसनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांचा आखाडा उत्साहात पार पडला यावेळी ॲडव्होकेट पै समीर पटेल, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान , अनिल गुंजाळ , आखाड्याचे आयोजक किरण कदम , अशोक तरटे ,कोंडीराम लबडे , संपत लबडे , मेजर पै याकुब पटेल , पै सुनील कदम , पैलवान सोमनाथ राऊत उपस्थित होते. बऱ्याच कालखंडानंतर चालू झालेल्या भातोडी गावच्या कुस्ती परंपरा जपण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते या आखाड्यामध्ये लहान मोठ्या दीडशे कुस्त्या पार पाडल्या. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पैलवान व त्यांचे वस्ताद उपस्थित होते. भातोडी येथील आखाड्यात पैलवानांना पन्नास रुपयापासून ५१००० पर्यंत रोख रकमेचे बक्षिसे देण्यात आले.
ॲडव्होकेट पटेल यांचे सामाजिक योगदान.
ॲडव्होकेट समीर पटेल हे जिल्हा न्यायालय,अहमदनगर येथे कार्यरत असून सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर आहेत. अनाथ मुलांचे शिक्षण,रुग्नाना रुग्णालयात मदत करणे त्यांना योजनांचा लाभ घेण्यास सहकार्य करणे, जिल्हा न्यायालयाच्या परिसरासह शहरात झाडे लावून त्या झाडांची देखरेख करणे अशा अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे ॲड.पटेल सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहेत. ॲड.पटेल यांचे क्रीडा शेत्रातील योगदान देखील अत्यंत महत्वाचे आहे. वकिली शेत्राच्या व्यस्त कामकाजातून कुस्तीप्रेमी असलेले पटेल हे एक उत्तम पैलवान देखील आहेत. अनेक पैलवान पटेल यांच्या तालमीत घडले आहेत. शासकीय पंच म्हणून देखील पटेल यांनी जबाबदारी पार पडली आहे.