अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचे मोठे वक्तव्य, सिद्धार्थच्या चाहत्यांनी केला संताप व्यक्त….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | ENTERTAINMENT | ACTOR SIDDHARTH SHUKLA | YOUTUBER ARMAAN MALIK | ARMAAN MALIK COMPARES HIMSELF WITH SIDDHARTH SHUKLA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी ३ सुरु झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या कार्यक्रमात वाद सुरु झाले आहेत. यंदाच्या सीझनमधील स्पर्धक यूट्यूबर अरमान मलिक खूप चर्चेत आहे. अरमान मलिक त्याच्या दोन बायकांसोबत बिग बॉस ओटीटी शोमध्ये दाखल झाला आहे. याच कारणामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून तो सध्याचा सर्वात ट्रेंडिग स्पर्धक ठरत आहे. अरमान मलिकच्या दोन्ही बायकांसोबतच्या लव्ह स्टोरीवरुन नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असताना, आता अरमान मलिकन दिवंगत सिद्धार्थ शुक्ला याच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
यूट्यूबर अरमान मलिकने सिद्धार्थ शुक्ला सोबत केली स्वतःची तुलना….
बिग बॉसच्या इतिहासात सिद्धार्थ शुक्ला सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक दोन बायकांसोबत आलेला स्पर्धक अरमान मलिकने स्वत:ची तुलना सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे. यूट्यूबर अरमान मलिकने म्हटले आहे की, तो सिद्धार्थ शुक्ला सारखाच आहे. असे म्हणत अरमान मलिकने स्वत:ची तुलना बिग बॉसमधील अत्यंत लोकप्रिय स्पर्धक सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. सिद्धार्थच्या फॅन फॉलोईंगची तुलना कुणाशीही करता येणार नाही. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस सीझन १३ चा विजेता ठरला होता. २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्लाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पण आजही सिद्धार्थ शुक्लाचे चाहते त्याला विसरु शकलेले नाहीत. असे असताना आता अरमान मलिकने स्वत:ची सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करणे, सिद्धार्थच्या चाहत्यांना मात्र आवडलेले नाही. यामुळेच अरमान मलिकवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.