TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ०३
अहमदनगर – अहमदनगर शहरात काल राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे वार्षिक तपासणीसाठी नगरमध्ये दाखल झाले होते. गुप्ता शहरात दाखल होताच शहरातली चूळबुळ पाहण्यासारखी होती. अवैध धंद्यांची शांतता सर्वसाधारण नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होती. मात्र काही तासातच हा समाधानकारक आनंदाचा शेवट झाला.

तालुका पोलिसांना अवैध धंद्यांची कल्पना. ?
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांचा बोलबाला आहेच,याची कल्पना प्रशासनाला नाही असे असणे शक्य नाही.तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या धंद्यांना वैतागलेल्या नागरिकांच्या तोंडी तक्रारीच्या खोलात जाण्याचा टाईम्स ऑफ अहमदनगरने प्रयत्न केला. अवैध धंद्यांच्या साम्राज्याचा पोलखोल टाईम्स ऑफ अहमदनगरने केला. मात्र या अवैध धंद्यांवर पोलिसांची अद्यापही कारवाई नसल्याने स्थानिक रहिवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

कमल्या गुटखा विक्रेता , संभ्या कलेक्शन स्विक्रेता.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक सरकारी कर्मचारी सुगंधित तंबाखूची विक्री करत असल्याची चर्चा सध्या स्थानिक रहिवासियांमध्ये चर्चेचा विषय आहे. या कर्मचाऱ्याला पार्टनर म्हणून कमल्या नामक इसम सहकार्य करत आहे. तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलेक्टर म्हणून मिरवणारा संभ्या पाकीट जमा करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मात्र कमल्या व संभ्या हे अत्यंत भयंकर असल्याचे पोलिसांच्या कारवाई शून्य अवस्थेतून स्पष्ट होत असल्याचे नव्याने सांगायची गरज नाही. तालुका हद्दीत हे दोन लाल काळे धंधे जोरात चालवत आहेत. संभ्या आणि कमल्या हे कोण आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस या दोघांचा शोध घेतील कि यांना पाथारुड घालतील हे पाहणे गरजेचे ठरेल.
भाग- ०४
संभ्याची अवैध हिंग , कमल्याच निघाला गुटखा किंग….. पोलीस कधी करणार ऑपरेशन स्टिंग ?

