अजिंक्य फिटनेस वर्ल्डच्या महिला दिन कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद फिटनेस आणि फनचा अनोखा मेळ, धनश्री विखेंनी केले कौतुक.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AJINKYA FITNESS | AJINKYA FITNESS NEWS | SURESH GAIKWAD | DHANSHREE VIKHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : भल्या पहाटे एकत्र आलेल्या युवती, महिलांनी फिटनेस आणि फन याचा मेळ साधत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. सक्कर चौकातील आधुनिक अजिंक्य फिटनेस वर्ल्डने शी फिट या थीमवर महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भव्यदिव्य अशा या कार्यक्रमात महिलांनी फिटनेसचे धडे गिरवतानाच मजेदार खेळांचाही आनंद लुटला. महिला दिनाची अतिशय सुंदर सुरुवात झाल्याने सर्व सहभागी महिलांचे चेहरे खुलले होते. या कार्यक्रमास धनश्री विखे यांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
अजिंक्य फिटनेसचे कार्य कौतुकास्पद.
महिला दिनाची सुरुवात योगासनांनी झाली. विविध प्रकारचे आसने केल्यानंतर प्राणायाम करण्यात आले. फिटनेस ॲण्ड फन अंतर्गत महिलांनी रस्सीखेच, बॉडी वेट एक्सरसाईज, जंपींग जॅक, फ्लोअर एक्सरसाईज केली. व्यायामाबरोबरच पुशअप, स्क्वॉट, फोर आर्म प्लॅन्क स्पर्धा घेण्यात आली. मराठी व हिंदी गाण्यांवर महिलांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. अतिशय नेटके नियोजन असल्याने सर्वांनाच कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता आला. धनश्री विखे यांनी जीमची पाहणी करून येथील अत्याधुनिक सोयी सुविधांची माहिती घेतली. पुढे बोलतांना विखे म्हणाल्या कि आताच्या काळात चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विशेषत: महिलांनी आरोग्याची, आहाराची काळजी घेतली पाहिजे.
अजिंक्य फिटनेसमध्ये शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट राहण्याचा मंत्र
अजिंक्य फिटनेस वर्ल्ड अतिशय अत्याधुनिक असून येथील व्यायामाच्या मशीनरी, ट्रेनिंग खूप प्रभावी आहे. व्यायामाबरोबरच पोषक आहारबाबतही येथे मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकालाच याठिकाणी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट राहण्याचा मंत्र मिळत असल्याचे विखे म्हणाल्या. या कार्यक्रमात सुमारे एक हजारापेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तर बेस्ट डान्सरचा किताब इशिका कालरा, समृध्दी झिने सूर्यनमस्कार स्पर्धेत तर सुवर्णा शेकटकर वृक्षासन स्पर्धेत प्रथम क्रमांक,फोर आर्म प्लॅन्कमध्ये चैताली गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
कार्यक्रमास अजिंक्य फिटनेस वर्ल्डचे संचालक अभिजीत गायकवाड, गायत्री गायकवाड, अजित गायकवाड, विजया गायकवाड, अभिमन्यू गायकवाड, योगीराज पडोळे, सूरज साबळे, प्राजक्ता पालवे, वैशाली भिंगारदिवे, अजय डाके व सर्व इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.