अन् रत्नदिपच्या भास्कर मोरेंचा तो किस्सा सांगतांना मुलींना रडू कोसळले , तर आमदार रोहित पवारांसह उपस्थितांना देखील अश्रू अनावर ….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR DISTRICT | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | RATNADEEP FOUNDATION | DR. KARAN GADE | MLA ROHIT PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर: दादा (रोहित पवार ) तो भास्कर मोरे आमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालतो. मोरेच्या मनासारखे वागले नाही तर तो रिल्हॉलवर काढून मुलींना मारण्याच्या धमक्या देतो. भास्कर मोरेने आमचे आयुष्य खराब केले आहे. आम्हाला भयंकर त्रास देऊन खूप छळलं असे म्हणत माणुसकीला काळीमा फासणार्या मात्र न सांगता येणार्या कृत्याचा पाढा वाचत असतानाच मुलींना रोहित पवार यांच्या आणि अधिकाऱ्यांसमोरच रडू कोसळलं. गेल्या आठ दिवसांपासून रत्नादीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष भास्कर मोरे विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सातव्या दिवशी रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी, आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले यांच्याबरोबर सुमारे पाच तास चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी भास्कर मोरे यांच्या अमानवी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा न सांगता येणाऱ्या कुकृत्याचा पाढा वाचला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मुलींनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी भास्कर मोरेंकडे कशा पोहचल्या ?
छळ झालेल्या विद्यार्थ्यांनीनी पुढे बोलताना सांगितले की आम्ही मागील वेळी पाच मुलींनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिले होते. मात्र पोलिसांना दिलेले तक्रार अर्ज पोलिसांकडून भास्कर मोरेकडे गेले. त्या तक्रारी अर्जावरून त्याने कॉलेजच्या मुलींना खूप टार्गेट केलं होत. जिथे पोलिसांकडूनच सुरक्षिततेच्या बाबी संभाळल्या जात नाहीत. तिथे आम्ही मुली कशा थांबणार.आम्हाला हे मेडिकल कॉलेज सुरक्षित वाटत नाही. कॉलेजमध्ये कसलाही आभ्यासक्रम शिकवला जात नाही. कॉलेज तपासणीसाठी विद्यापिठाची समिती आल्यावर आम्हाला रुग्ण बनवून सलाईन लावले जाते मग न शिकवता डिग्री अशीही भेटणार आहे. फक्त पैसे भरा आणि मोकळे व्हा असे भास्कर मोरे मुलींना सांगायचा असं छळ झालेल्या मुलींनी सांगितलं. तसंच मोरेंनी सांगितले ते नाही केले तर…..
स्त्रोत.सोशल मिडिया.
असं सांगताना मुलींना रडू कोसळले. त्यामुळे उपस्थितांचेही डोळेही पाणावले.
सिनियर मुलींकडून जूनिअर मुलींना जबरदस्तीने शिकविण्यास भाग पाडले जाते. रोज कॉलेजमध्ये मनावर दडपण ठेवून जातो. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना प्रशासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांसमोर या विद्यार्थिनी माझ्या मुलीसारख्या आहेत. स्वच्छ प्रतिमा स्वतःहून सांगतो अन् माझी मुलगी म्हणतो. नंतर त्याच मुलींबरोबर फ्लर्ट करतो. लज्जास्पद बोलतो. विद्यार्थी अन् शिक्षक या नात्याला मोरे याने कलंक लावला आहे. असे सांगत तीव्र संतापजनक भावना मुलींनी रडत रडत व्यक्त केल्या. आम्हाला आमचे कॉलेज बदलून मिळाले नाही तर आम्ही जीवनाचं बरं वाईट करू, असा इशारा रत्नदीपच्या उपोषणकर्त्या काही मुलामुलींनी दिला आहे.पुढे बोलताना एका मुलीने सांगितले की, मुली फिर्याद दाखल करायला तयार आहेत तर पोलीस म्हणतात नंतर करू , नंतर बघू असं वारंवार सांगुन टाळाटाळ करत होते. असं उपोषणकर्त्यां मुलींनी अधिकारी आणि आमदार रोहित पवार यांच्यासमोर सांगितले. मुलींचा सर्व धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, रोहित पवारला खिशात ठेवणारं कोणीही अजून जन्मलेले नाही. मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कारवाई होणारच. रत्नदीपच्या मुलांमुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे. कोणीही राजकारण आणू नये. तसेच रोहित पवार हा तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्याबरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे कॉलेज ट्रान्सफर करण्याचा पुर्ण प्रयत्न करू. जामखेड कर्जतचे नागरिक चांगले आहेत, म्हणूनच बाहेरगावच्या मुलामुलींच्या पाठिशी एकजूटीने उभे आहेत असे सांगून आमदार रोहित पवार यांनी रत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मुलामुलींना आश्वस्त केले.