अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार, बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवतारेंची भूमिका ठाम.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEPUTY CHIEF MINISTER DEVENDRA FADNAVIS | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | VIJAY SHIVTARE | SUPRIYA SULE | BARAMATI LOK SABHA CONSTITUENCY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पक्की असल्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळही जाहीर केली आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातून काढून टाकले तरी मी निवडणूक लढविणारच असा पवित्रा घेतल्यानंतर आता अजित पवार गटही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभेत असहकार करण्याची भाषा वापरली होती. मात्र आता मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
एका प्रतिष्ठीत माध्यमाशी संवाद साधताना मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.