By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: संभ्या आणि कमल्याची आर्थिक वारी , त्यांच्या लालचेमुळे तालुका हद्दीत वाढतीये गुन्हेगारी ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > संभ्या आणि कमल्याची आर्थिक वारी , त्यांच्या लालचेमुळे तालुका हद्दीत वाढतीये गुन्हेगारी ?
अहमदनगर

संभ्या आणि कमल्याची आर्थिक वारी , त्यांच्या लालचेमुळे तालुका हद्दीत वाढतीये गुन्हेगारी ?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE OFFICE, AHMEDNAGAR TALUKA POLICE STATION | CRIMINAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/28 at 12:51 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी आवळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद गीतेंची ताकद कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंद्यांचे साम्राज्य.गीतेंनी काही महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली आहेत. गीतेंच्या तालुका हद्दीत वारंवार मारामारी,अवैध धंद्यांचा सुळसुळाट , परप्रांतीय महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचे काम काही बहाद्दूर करत आहेत.मात्र या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी गीतेंच्या हालचाली का मंदावल्या आहेत हा मात्र संसोधनाचा विषय आहे. गीतेंनी गुन्हेगारांवर कारवाई करावी मात्र गुन्हेगारांपुर्वी गुन्हेगारांना आर्थिक फायद्यासाठी मदत करणाऱ्या संभ्या आणि कमल्या यांच्यावर अगोदर कारवाई करावी अशी अपेक्षा सध्या सर्वसाधारण व्यक्ती व्यक्त करत आहेत. 

Pune Poilce: लाच घेणारा हवालदार जाळ्यात; महिलेची तक्रार न घेण्यासाठी  मागितले ५ हजार - Marathi News | pune poilce constable caught taking bribe  Asked for Rs 5,000 for not taking the womanस्त्रोत.सोशल मिडिया.

साहेबांची मज्जा , कमल्या व संभ्यावर आर्थिक बोज्जा ?

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु आहेत. मात्र संबंधित जबाबदार अधिकारी यांना कोणत्याही घटनेची गंभीरता नाही. मात्र वरिष्ठांना देखील गंभीरता नसल्याचे एकंदरित चित्र स्पष्ट आहे. कारण तालुका हद्दीत संभ्या आणि कमल्या नामक दोन इसम मोठा आर्थिक झोलझाल करत आहेत. लाखोंची लक्ष्मी अधिकाऱ्यांच्या नावावर हे बहाद्दूर जमा करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिकाऱ्यांच्या नावावर एवढा मोठा गैरकारभार सुरु असून देखील अधिकाऱ्यांना माहित नसेल तर नवलच. मात्र वरिष्ठांना जर गुप्त माहितीदाराकडून जर हि माहिती उपलब्ध होत नसेल तर यावर शंकाच व्यक्त होऊ शकते.   

औरंगपूर रस्त्यावर गाडी अडवून चौघांनी एकाला मारहाण करून लुटलेस्त्रोत.सोशल मिडिया.

तालुका हद्दीत गुंडाराज ? 

एका हॉटेल चालकाशी २ दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील २ कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली.याबाबत हॉटेलचालक राजु मुक्ताजी सुंबे (रा. सोनेवाडी, ता.नगर) यांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुंबे यांचे अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर दोन्ही गावांच्या शिवेलगत हॉटेल निवांत नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी रविवारी (दि.२४) मध्यरात्री काही तरुणाचे हॉटेल मधील कामगार व फिर्यादी सुंबे यांच्याशी वाद झाले होते.

याचा राग मनात धरून सारोळा कासार गावातील गणेश तुकाराम कडूस, शरद रमेश भोसले, वैभव राजु धामणे, शुभम गुलाब धामणे, राहुल बापू कडूस, शुभम गोरख पुंड, सलीम राजु शेख, राहुल गोरख पुंड, शुभम दत्तात्रय कडूस, आकाश बापू कडूस, विशाल रावसाहेब धामणे, लखन तुकाराम काळे, वैभव दिलीप कडूस, शुभम दत्तात्रय कडूस (सर्व रा. सारोळा कासार, ता.नगर) यांनी सोमवारी (दि.२५) रात्री हॉटेलवर जावून लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने हॉटेल मधील टेबल खुर्च्या यांची तोडफोड केली. हॉटेलच्या बाहेर केलेल्या छोट्या छोट्या कोप्यांना आग लावून पेटवून दिले. तसेच हॉटेल चालक राजु सुंबे, व्यवस्थापक आप्पा किसन पळसकर, आचारी राहुल भिकाजी पाटील यांना काठ्या व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तर एकाने आचारी राहुल पाटील याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बिअरची बाटली फोडली असल्याचे सुंबे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

या फिर्यादी वरून वरील १४ जणांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, तसेच यात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article कमल्या आणि संभ्या कोणाचे पंटर , कधी चालणार या पंटरवर गितेंचा हंटर ?
Next Article हिंदुत्ववादी कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?