हिंदुत्ववादी कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SHIV SENA AHMEDNAGAR | EKNATH SHINDE | DIGAMBAR GENTYAL | ANIL SHINDE | DILIP SATPUTE | BABU TYRWALA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी दिगंबर गेंट्याल यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असतानाच, गेंट्याल यांनी शिवसेनेची वाट धरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, गेंट्याल हे कट्टर हिंदुत्त्ववादी नेते आहेत.
दिगंबर गेंट्याल हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असे पत्रात म्हटले आहे. गेंट्याल हे गेल्या ३० वर्षांपासून नगर शहरात हिंदुत्वावादी संघटनांमध्ये कार्यरत आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. नगर शहरातील रामनवमी मिरवणूक ही गेंट्याल यांनी सर्वप्रथम सुरू केली आहे. यापूर्वी गेंट्याल यांनी हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून हिंदूराष्ट्रसेनेपासून ते दुरावले होते. मात्र, दरम्यानच्या काळात अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देशभर काढण्यात आलेल्या कलश यात्रेतही सहभाग नोंदविला आहे.
दिगंबर गेंट्याल यांच्यावर सुभेच्छांचा वर्षाव.
हिंदुत्वावादी नेते असले तरी माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. यामाध्यमातून अनेक गोरगरीब, गरजूंना त्यांनी मदत केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेंट्याल यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की यापुढील काळात आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या विचारांप्रमाणे काम करणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना बळकट होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल गेंट्याल यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख,बाबुशेठ टायरवाले,जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.