By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पती पत्नीचा वाद अन, झाला खून ; पत्नीनेच नातेवाईकांच्या सहाय्याने केला पतीचा खून.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > पती पत्नीचा वाद अन, झाला खून ; पत्नीनेच नातेवाईकांच्या सहाय्याने केला पतीचा खून.
क्राईम न्यूज

पती पत्नीचा वाद अन, झाला खून ; पत्नीनेच नातेवाईकांच्या सहाय्याने केला पतीचा खून.

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MURDER IN KEDGAON | THE BODY WAS FOUND NEAR CHANDBIBI MAHAL | TALUKA POLICE STATION | THE WIFE KILLED HER HUSBAND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/04/27 at 7:41 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती – पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह चांदबीबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) शिवारात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी मयताची पत्नी व तिच्या माहेरचे नातेवाईक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मयताची पत्नी व मेव्हण्याला अटक केली आहे.

Badaun double murder case: What we know so far. Top developments in 10  points | Mintस्त्रोत.सोशल मिडिया.

पतीच्या खुनात पत्नीच आरोपी.

प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय २८, रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे नाव आहे. तर त्याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे (मूळ रा. केळ पिंपळगाव, हल्ली रा. शास्री नगर, केडगाव), सासरा सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेव्हणा अजय सोमनाथ बनकर, मेव्हणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. शास्री नगर, केडगाव) अजय बनकर चा मेव्हणा मोहित दिनेश पाडळे (रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन रोड, केडगाव) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, ३२३, १४३, १४७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत प्रशांत घाटविसावे याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे (रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

CNA Explains: What is the difference between murder and culpable homicide  not amounting to murder? - CNAस्त्रोत.सोशल मिडिया.

मृतदेह चांदबीबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) येथे आढळून आला.

मयत प्रशांत घाटविसावे हा मंगळवारी (दि.२३)केडगाव येथे पत्नीच्या माहेरी कार्यक्रमासाठी आलेला होता. रात्री पती – पत्नीच्या वादातून त्याचे व त्याच्या सासरच्या लोकांचे वाद झाले. ही बाब त्याने कुटुंबियांना फोन करून कळविली होती. त्या नंतर बुधवारी (दि.२४) त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद लागला. गुरुवारी (दि.२५) सकाळ पासूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्याला शोधण्यासाठी त्याचे भाऊ व इतर नगरकडे येत असताना दुपारी त्यांना फोन वर समजले की प्रशांत याचा मृतदेह चांदबीबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) येथे आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तेथे धाव घेत पाहिले असता मयत प्रशांत याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुना दिसल्या. त्यामुळे त्याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे याने गुरुवारी रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात मयताची पत्नी व इतर नातेवाईक अशा ६ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article भाजपने केला पूनम महाजनांचा पत्ता कट ; आता उज्वल निकम भाजपचे अधिकृत उमेदवार.
Next Article भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. ; अत्रे असते तर म्हणाले असते असा हरामखोर दहा हजार वर्षांत झाला नाही.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?