प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याला त्याच्या आवडीचा साथीदार मिळावा आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्नही करत असतो. लग्नासाठी मुला आणि मुलीच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. त्यातील सर्वात सामान्य अपेक्षा म्हणजे मुलाची चांगली किंवा सरकारी नोकरी असावी. पण मुलांना आता मुली मिळणं खूप कठीण झालं आहे. मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मुलांच्या नाकी नऊ येतात. पुण्यातल्या अशाच एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं त्यानं एक बायोडेटा बनवून त्याचं पोस्टर छापलं आहे. हे पोस्टर त्यानं चौका चोकात लावलं आहे. दरम्यान या तरुणाचा बायोडेटा वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Vadhuvaronline.com | Vadhu Var Suchak Mandal | Welcome to VadhuVar Onlineस्त्रोत.सोशल मिडिया.

वधू किंवा वर शोधण्यासाठी लोक काय-काय करतात….

लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी शोधण्यासाठी एका व्यक्तीने असा अनोखा मार्ग शोधला की सारेच हैराण झाले आहेत. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वधू किंवा वर शोधण्यासाठी लोक काय-काय करतात ? नातेवाईकांना आपला लग्नाचा बायोडेटा शेअर करतात. वेगवेगळ्या सोशल मिडिया साइट्सची मदत घेतात किंवा वर्तमानपत्रात जाहिराती देतात. अशा प्रकारे वधू किंवा वराची शोध मोहीम सुरु होते. जोपर्यंत आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही तोपर्यंत आपली शोध प्रक्रिया चालू राहते . जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार भेटतो, तेव्हा आपण आपली शोध प्रक्रिया थांबवतो.पण एका पठ्ठ्याने वधू शोधण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. या तरुणाच्या बायोडेटावर सर्वसामान्यपणे जशी माहिती असते तशी दिलेली आहे. म्हणजेच, मुलाची माहिती. नाव – मनिष खामकर, गावं – वाटेगांव, शिक्षण – १२वी पास, शेती – १ एकर, नोकरी – पुण्याला कामाला. शेवटचा पर्याय म्हणत या तरुणानं त्याच्या बायोडोटाच्या शेवटी, अपेक्षा – पोरगी कसली पण असुदे फक्त जीवंत पाहिजे. अशी अपेक्षा लिहली आहे