बाजूला दोन मुडदे पडलेले असताना आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालताय. खोटा मेडीकल रिपोर्ट देताय. – संजय राउतांचा हल्लाबोल.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | SHIV SENA UDDHAV BALASAHEB THAKARE GROUP LEADER SANJAY RAUT PUNE | KALYANI NAGAR ACCIDENT | PUNE COMMISSIONER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली ? दोन निष्पाप लोकांचे बळी गेलेत. जो माजोरडा, दारूडा जो बिल्डरचा मुलगा आहे. तो दारू पितांना दिसतोय सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओमध्ये दिसतंय तरी तुम्ही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह देताय ? कोणी केलं हे सगळं ? भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक भ्रष्ट आमदार…
स्त्रोत.सोशल मिडिया.
पुणे पोलीस आयुक्तांच्या समोर पुण्यातील जनतेने आंदोलन करायला हवं.
ठाकरे गटाचे नेते संजय राउत यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली तर पुणे पोलीस आयुक्तांच्या समोर पुण्यातील जनतेने आंदोलन करायला हवं, असे आवाहनही राऊतांनी पुणेकरांना केलं आहे. तर बाजूला दोन मुडदे पडलेले असताना आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालताय. खोटा मेडीकल रिपोर्ट देताय, असा हल्लाबोल करत त्या आरोपी मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार घातला पाहिजे. असे आयुक्त जर पुण्याला लाभले असतील तर पुण्याला लागलेला तो कलंक आहे, असे म्हणत राऊतांनी पुणे अपघात प्रकरणावर हल्लाबोल केलाय.