महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे पक्ष निवडणुकीला सामोरे जात असले तरी महायुती किंवा मविआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. महायुतीने म्हटलं आहे की, आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. तर मविआच्या नेत्यांनी म्हटलं आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदासाठीचा नेता ठरवू. मविआमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जावं यासाठी प्रचार करत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेने सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत मौन बाळगलं आहे.

अजितदादांकडून मुश्रीफांची उमेदवारी जाहीर होताच कोल्हापुरात समीकरणं बदलली; कुणाला फायदा? - Marathi News | Kolhapur Ajit Pawar Hasan Mushrif Candidacy announced Latest Marathi ...(संग्रहित दृश्य.)

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास…..

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होईन. असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कागलमधील एका प्रचारसभेत बोलत असताना मुश्रीफांनी हे वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा कागलमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान  स्वतःचा प्रचार करत असताना कागलमध्ये आयोजित एका प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी होऊन आपली राज्यात सत्ता येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनी तसं ठरवलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आणायचं असं त्यांनी ठरवलं आहे. राज्यात पुन्हा एकदा आमची सत्ता आली तर याहीपेक्षा अधिक चांगलं खातं मला मिळेल की नाही ?  मुश्रीफांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री हसन मुश्रीफ, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना थांबवलं. ते म्हणाले, नाही मुख्यमंत्री नाही होणार, झालो तर मी उपमुख्यमंत्री होऊ शकेन. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहे, काही ठिकाणी तीन, मग आपल्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत का ?