By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: बाळासाहेब थोरात यांचे सुजय विखेंना थेट आव्हान, आता जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > बाळासाहेब थोरात यांचे सुजय विखेंना थेट आव्हान, आता जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य.
अहमदनगर

बाळासाहेब थोरात यांचे सुजय विखेंना थेट आव्हान, आता जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य.

Last updated: 2024/10/28 at 4:46 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

संगमनेर मतदारसंघात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकारणात थोरात गटविरुद्ध विखे पाटील गटाच्या वाद चर्चेचा विषय ठरलाय आहे.  धांदरफळ येथे जाळपोळ व गाड्यांचे तोडफोड केल्याची घटना घडल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर बाळासाहेब थोरात  यांनी विखे पाटील यांना आव्हान दिलं आहे.  एकदा तुलना होऊन जाऊ द्या, कुठे दहशत आणि कुठे दडपशाही हे कळेल.  माझी तयारी आहे तुलना करण्याची असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना आव्हान देत चांगलंच सुनावल्याचं  दिसलं.  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मतदार संघात घडलेल्या प्रकारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे पाटील यांच्या समर्थक वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  यावर तुम्ही मर्द होतात तर पळून कशाला गेलात ? असा सवाल थोरातांनी केलाय. थोरात समर्थकांनी जाळपोळ व गाड्यांची तोडफोड केल्याची ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंत वाद गेला आहे. आता तुलना होऊन जाऊ दे असं म्हणत थोरात विरुद्ध विखे असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. 

Congress leader Balasaheb Thorat Angry reaction on Balasaheb Thorat and Sujay Vikhe Patil after case registered on Jayshree Thorat in sangamner Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतंय;(संग्रहित दृश्य.)

तुम्ही जर मर्द होतात तर पळाले कशाला..

संगमनेरमधील भाजपच्या नेत्यांना विचारा निवडणूक झाल्यानंतर आम्ही कधी राजकारण केलं ? असा सवाल करत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटलांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, शिर्डी मतदारसंघात विकास करण्यासाठी काम करायचा आहे तर होऊन जाऊ द्या तुलना. दोन्ही व्यक्तिमत्व दोन्ही तालुके विकास आणि जनता न्यायालयात सगळं मांडू असं म्हणत थोरात यांनी विखेंना आव्हान दिला आहे. ज्यावेळी धांदरफळमध्ये वक्तव्य झालं त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होतात. नंतर पंधरा मिनिटात लोक आले की म्हणालात आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. सुजय विखे ला विचारा महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून सुजय पळून गेले. तुम्ही जर मर्द होतात तर पळाले कशाला. असा टोलाही थोरात यांनी लगावला.  धांदरफळमधील वक्तव्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, दोन व्यक्तिमत्व दोन तालुके आणि विकास जनता न्यायालयात सगळं मांडू. आता जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य. असा आव्हान बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना दिले. ते म्हणाले, जिला न्याय मिळाला पाहिजे होता आणि देशमुखला अटक व्हायला हवी तो इकडच्याच भागात आहे मला कळलं. दुसऱ्या दिवशी पुण्याला पाठवलं आणि अडचण होण्याआधी अटक व्हायला लावलं. घाबरायच नाही. स्वातंत्र्य मिळवायचं असेल पुढे यावं लागेल. आमच्या तालुक्यात लोक भांडतात माझ्याशी आणि प्रेम ही करतात. मी भक्कापणे तुमच्या पाठीशी आहे. भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे आणि जयाचा बाप आहे. त्यामुळे घाबरु नका. फसायच नाही भक्कम राहायचं. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळणार, अजित पवारांचं मोठं विधान.
Next Article अजित पवारांचा पत्ता कट ? हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री होणार ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?