By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान, खूर्च्यांची फेकाफेकी, ईव्हीएमची तोडफोड…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान, खूर्च्यांची फेकाफेकी, ईव्हीएमची तोडफोड…..
महाराष्ट्र

तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान, खूर्च्यांची फेकाफेकी, ईव्हीएमची तोडफोड…..

Last updated: 2024/11/20 at 5:04 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

महाराष्ट्र विधानसभेच्या परळी मतदारसंघात बोगस मतदानावरून मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे     नेते माधव जाधव यांना मतदार केंद्रावर जात मारहाण केल्यानंतर त्याचे पडसाद इतर मतदार केंद्रावरही होत आहेत. बीडमधील परळी मतदारसंघात तीन मतदानकेंद्रावर तासभर मतदान थांबवण्यात आले होते. घाटनांदुरमध्ये मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीनंतर त्या तीन मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया  थांबवण्यात आली होती. मतदानकेंद्रावरील मतदान यंत्रांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाकडून पोलिसाला पाचारण करण्यात आले आहे. परळीत या राड्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालं होतं. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सुत्रांनी सांगितलं. घाटनांदूर मतदान केंद्रात तासाभरानंतर वातावरण निवळल्यानं पुन्हा सुरळीत मतदान सुरु झाले आहे. बोगस मतदानावरून झालेल्या वादात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद परळीत त्यांच्या घाटनांदूरच्या मतदान केंद्रांवर तणाव दिसला. घाटनांदूरच्या तीन मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. मतदानकेंद्रातील खूर्च्यांची फेकाफेकी झाल्याचंही दिसून आलं आहे. परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर उभे असताना, जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नांदगाव-मनमाड रस्त्यावर सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी, म्हणाले….मी तुझा मर्डर….
Next Article विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?