By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा….
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा….

Last updated: 2024/11/21 at 12:13 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसतंव आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं आहे. त्यामुळे जास्त झालेलं मतदान कोणाच्या पारड्यात गेलं? आणि या निवडणुकीत कोणाला धक्का बसणार? हे २३ नोव्हेंबरला  होणाऱ्या निकालात स्पष्ट होईल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान ६८ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी  भागांमधील मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला आहे. या शहरांमध्ये फक्त ५० ते ५५ टक्के मतदान झालं आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्यासा फारसं यश आलं नसल्याचं दिसलं. राज्यात सर्वाधिक ८२  टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झालं आहे. तेथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे समरजितसिंह घाटगे यांच्यात चुरशीची लढत होती.

Punjab By Election 2024 Voting date change voting on 20 November instead 13 November | पंजाब की चार विधानसभा सीटों पर उपचुनाव की तारीख बदली, जानें- कब होगी वोटिंग?(संग्रहित दृश्य.)

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत…

सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या कुलाबा मतदारसंघात देखील सर्वात कमी मतदान झालं आहे. मंत्रालय आणि विधानभवन यासारखी सत्तेची प्रमुख केंद्रं असलेल्या कुलाबा मतदारसंघांत मतांचा टक्का वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले होते, तरीही तेथे ४५ टक्के मतदान झालं आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.२९ टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत विधानसभेच्या मतदान टक्क्यात वाढ झाली आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान ६८ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ टक्के मतदान झालं होतं. शहरी भागांच्या ग्रामीण भागात मतदारांचा आकडा जास्त होता. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागला असला तरी मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे, मतदानाने ६५ ची टक्केवारी गाठली होती. यात पुढे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीसं वाढलेलं दिसलं. संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान सर्वाधिक मतदान झालं आहे. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत ५६ टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक ६२ टक्के मतदान भांडूप पश्चिम मतदारसंघात झाले असून बोरीवली आणि मुलुंडमध्येही ६१ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांदिवलीमध्ये सर्वात कमी ४८ टक्के मतदान झालं आहे. वडाळा मतदारसंघात सर्वाधिक ५८ टक्के, तर कुलाब्यात सर्वांत कमी ४५ टक्के मतदान झाला आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी.

अहमदनगर – ७१.७३ टक्के
अकोला – ६४.४५ टक्के
अमरावती – ६५.५७  टक्के 
औरंगाबाद- ६८.८९ टक्के
बीड – ६७.७९ टक्के
भंडारा – ६९.४२ टक्के 
बुलढाणा – ७०.३२ टक्के 
चंद्रपूर- ७१.२७ टक्के
धुळे – ६४.७० टक्के 
गडचिरोली – ७३.६८ टक्के 
गोंदिया – ६९.५३  टक्के
हिंगोली – ७१.१० टक्के
जळगाव – ६४.४२ टक्के
जालना – ७२.३० टक्के
कोल्हापूर – ७६.२५ टक्के
लातूर – ६६.९२ टक्के
मुंबई शहर- ५२.०७ टक्के 
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के
नागपूर – ६०.४९ टक्के
नांदेड –  ६४.९२ टक्के
नंदुरबार- ६९.१५  टक्के
नाशिक – ६७.५७  टक्के
उस्मानाबाद – ६४.२७ टक्के
पालघर – ६५.९५ टक्के
परभणी – ७०.३८ टक्के
पुणे –  ६१.०५ टक्के
रायगड –  ६७.२३ टक्के 
रत्नागिरी – ६४.५५ टक्के
सांगली – ७१.८९ टक्के
सातारा – ७१.७१ टक्के
सिंधुदुर्ग – ७२ टक्के
सोलापूर – ६७.३६ टक्के
ठाणे – ५६.०५ टक्के
वर्धा –  ६८.३० टक्के
वाशिम – ६६.७७  टक्के
यवतमाळ – ६९.०२ टक्के

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान, खूर्च्यांची फेकाफेकी, ईव्हीएमची तोडफोड…..
Next Article एक्झिट पोल फ्रॉड आहे ,२३ तारखेला अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?