विधानसभेच्या निवडणुकीचं मतमोजणी सुरु आहे. पुढील काही तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या निकालावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राहुल गांधी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या अहंकाराचा हा पराभव आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
कोणाचं सरकार येणार?
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी व्होट जिहादसाठी मालेगावमध्ये पैसे पाठवले होते. आतापर्यंत ईडीने ३६३ कोटी रुपये रिकव्हर केले आहे. आता विधानसभेचा हा जो पराभव आहे तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोवीडच्या काळात केलेल्या घोटाळ्याचा आणि त्यांच्या अहंकाराचा पराभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने गेल्या दोन अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, हम एक है तो सेफ है. योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, बंटेंगे तो कटेंगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की व्होट जिहादच्या विरोधात धर्म युद्ध. महाराष्ट्राने व्होट जिहादला कशा पद्धतीने रोखलं जाऊ शकतं? हे दाखवून दिलं आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. महाराष्ट्रात काय होणार? कोणाचं सरकार येणार? महायुतीला किती जागा मिळणार? महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? दरम्यान, महायुतीमध्ये भाजपा १३१ शिंदे सेना ५५ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या ६० जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस २२, ठाकरे गट २० आणि शरद पवार गटाचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत. लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली आहे. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.