By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तारीख ठरली, २५ नोव्हेंबरला शपथविधी,कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > तारीख ठरली, २५ नोव्हेंबरला शपथविधी,कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
महाराष्ट्र

तारीख ठरली, २५ नोव्हेंबरला शपथविधी,कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

Last updated: 2024/11/23 at 5:50 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल २०० पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला १२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आत्ताच भाजपचा मुख्यमंत्री  होणार, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनरही झळकवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी २५ तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून, महाराष्ट्राचा नवीन सरकारमधील मुख्यमंत्री कोण हे कोडे लवकरच उलगडेल.

शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार - BBC News मराठी(संग्रहित दृश्य.)

एकनाथ शिंदेंकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा…

राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ २६ तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील ३ दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.  महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, २६ नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल का हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. देवाभाऊंचा हा सर्वात स्ट्राँग पॉइंट आहे की, ही डसन्ट केअर अबाऊट. त्यांना पदाची काही फिकर नाही. राजकारणामध्ये पदं येत राहतात आणि जात राहतात, पण आपलं काम करत राहणे हीच देवाभाऊंची विशेषत: आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीला जे यश मिळतंय, त्यामध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळायला हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article हा विजय आमच्या कामाची पोचपावती व लाडक्या बहिणींचे प्रेम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
Next Article महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमनं केलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?