कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याला मुख्यमंत्री शिंदेंचा मान….. तर दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री पावरांचा उलट प्रश्नांचा बाण ……!
विध्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा थेट सभागृहात सवाल

काँग्रेस पक्षाच्या त्या नेत्याच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री पवारांची “नामंजुरी”.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी. संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. बुधवारी पुण्यात बालगंधर्व जवळील झाशी राणी चौकात नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियासह विविध विद्यार्थी संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या वक्तव्याचा घोषणा देत निषेध नोंदवला . तसेच सारथी, बार्टी ,महाज्योती आदी संस्थांमध्येतर्फे पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी केली.सारथी संस्थेच्या माध्यमातून पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जात होती. मात्र, राज्य शासनाने केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित असून या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देताना विद्यार्थी ‘पीएचडी करून काय दिवा लावणार आहे ?’ असा उलट सवाल केला. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संशोधन केल्यामुळेच शास्त्रज्ञांनी दिव्याचा शोध लावला, असे खोचक वक्तव्य काही विद्यार्थी करत आहेत. तसेच अजित पवार यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.Sign in to your account

