By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांनी आमच्यावर बलात्कार केला,आम्ही गर्भवती राहिलो अन् आम्हाला गर्भपात करण्यास भाग पाडले. आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पत्र व्हायरल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांनी आमच्यावर बलात्कार केला,आम्ही गर्भवती राहिलो अन् आम्हाला गर्भपात करण्यास भाग पाडले. आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पत्र व्हायरल.
क्राईम न्यूज

उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांनी आमच्यावर बलात्कार केला,आम्ही गर्भवती राहिलो अन् आम्हाला गर्भपात करण्यास भाग पाडले. आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पत्र व्हायरल.

TIMES OF AHMEDNAGAR | CRIME NEWS | MAHARASHTRA | VIOLENCE AGAINST WOMEN POLICE | LETTER OF WOMEN POLICE PERSONNEL VIRAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|

Last updated: 2024/01/08 at 8:53 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा एक हजार रूपये लाच स्विकारत असल्याचाही आरोप महिला शिपायांनी केला आहे.

 

बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या,त्यामुळे त्यांना गर्भपात….. 

abortion की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi - Zee News Hindi

आठ महिला पोलीस चालकांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असल्याचाही आरोप पत्रात केला आहे.नागपाडा मोटार परिवहन विभागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आठ पीडित महिला नागपूर मोटार परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षकांनी आमचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा एक हजार रूपये लाच स्विकारत असल्याचाही आरोप महिला शिपायांनी केला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरु आहे. बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले होते. या प्रकरणी आवाज उठविला असता आमची बदली करण्यात आल्याचेही महिला शिपायांनी म्हटले आहे. या पत्रात आठ महिला पोलीस शिपायांची नावे असून त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सीबीआय , गुन्हे शाखा आणि सायबर सेलमार्फत चौकशी करून सबंधित अधिकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 

लेटर कोणी पाठवले ? 

Health Check: what controls our sex drive? When and why do we feel like sex?

दरम्यान हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून महिला पोलीस शिपायांना त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांकडून आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत फोन येत आहेत. तसेच वरील हे सर्व आरोप महिला पोलीस शिपायांनीच फेटाळले आहेत. हे पत्र व्हायरल झाल्यापासून मला एकामागून एक कॉल येत आहेत. सुरुवातीला वाचून मला धक्काच बसला कारण मी असे कोणतेही पत्र लिहिले नव्हते. माझे कुटुंबीय घाबरले, आणि पत्रातील मजकूर खरा आहे या विचाराने माझे पालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांनाही नातेवाईक आणि मित्रांकडून फोन येऊ लागले असे एका महिला कॉन्स्टेबलने सांगितले. कथित पत्रात माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांना मी पाहिलेही नाही.हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. मी शनिवारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पण त्यांनी मला सविस्तर अर्ज लिहायला सांगितले आणि मला ज्यांचा संशय आहे त्यांची नावेही लिहायला सांगितली. पण मला कामावर जायचे होते, म्हणून मी तेव्हा तक्रार केली नाही. पण मी सोमवारी परत जाईन तक्रार नोंदवायला असे दुसऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने म्हटले आहे. दरम्यान पोलीस दलात खळबळ उडवून टाकणारे हे लेटरबॉम्ब माटुंग्यातून स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आले होते. या प्रकरणी आता पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच हे पत्र पाठवणाऱ्या आरोपीचे ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या प्रकरणावर सह पोलिस आयुक्त एस जयकुमार इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्ही या बलात्काराच्या आरोपांची चौकशी करत होतो. मात्र आठ महिला पोलीस शिपायांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र न लिहल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आम्ही पत्र पाठवलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पोलीस उपनिरीक्षकाने केला तिच्यावर बलात्कार मग त्याच्या बायकोने तिला जातीवाचक शिव्या दिल्या. 376 व ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल.
Next Article रामलल्लासोबतच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा. २२ जानेवारीलाच डिलिव्हरी करण्याचा महिलांचा आग्रह,प्रशासन म्हणत ……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?