कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणी नमुना अहवालात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ.अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.यापैकी एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. अशी माहिती सूत्रांच्या आधारे प्राप्त झाली आहे.

Pune Car Accident : 'तावरेंच्या सांगण्यावरूनच डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे  नमुने कचऱ्याच्या पेटीत फेकले'; DNA चाचणीत धक्कादायक बाब उघड ...स्त्रोत.सोशल मिडिया.

मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना….

अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्यांकडून हे तीन लाख रुपये घेण्यात आले. डॉ. आणि डॉ. हाळनोर यांना अटक करण्यात आल्यानंतर काहीच तासांनी अतुल घटकांबळे यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे या तिघांनाही ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन लाखांपैकी अडीच लाख रुपये हलनोरकडून तर उरलेले ५० हजार रुपये घटकांबळेकडून गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. घटकांबळे हे डॉ.तावरे यांच्याकडे काम करत होते. मात्र हे तीन लाख रुपये घटकांबळे यांनी कुठून आणले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोमवारी एका सरकारी वकिलाने पुण्यातील न्यायालयात सांगितले, या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांनीही आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने नष्ट केले. त्याऐवजी अन्य व्यक्तीच्या रक्ताचे नमुने दिले. त्यामुळे पोलिसांना तिघांची समोरासमोर चौकशी करायची होती.अगरवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | Kalyani Nagar Accidentस्त्रोत.सोशल मिडिया.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना संशय आला.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला होता. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले होते. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्ततपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना संशय आल्याने १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ओैंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी (२६ मे) पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालांत मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही.