भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….!
संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी
-
संसदेत गोंधळ घालून प्रसिद्ध होण्याचा तरुणांना डाव असल्याचे संकेत आहेत.संसदेचे वातावरण तापवणे,आणि मंत्र्यांना घाम फोडणे बेरोजगार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. घटनेतील चारही आरोपी तरूणांवर दहशतवादाचा आरोप ठेवत आज न्यायालयाने त्यांना ०७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भाजपच्या खासदारांनी दिले पास,अन घुसले आत ?
धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय ? जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
बुधवारी लोकसभेत संसदीय कामकाज सुरू असताना देशातील चार तरुण अचानक संसदेत सुरक्षा मोडून घुसले. एकाने तर चक्क संसदेत उडी मारली. पिवळा, पांढरा, लाल रंगाचा धूर पसरवला तर त्याच्या काही जोडीदारांनी बाहेरही धूर पसरवून घोषणाबाजी केली होती.
तरुणांनी हे पाउल का उचलले ?
संसदेत घुसणारे तरुण हे सारे अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबांतून आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. बेरोजगारीमुळे त्यांनी एकत्र येऊन लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याची योजना आखली व तडीस नेली, असे सांगितले जाते.
लोकसभेत घुसलेल्या दोघांपैकी सागर शंकरलाल शर्मा हा लखनौच्या आरामबागेत राहणारा आहे. तो बॅटरीवरील रिक्षा चालवतो. त्याचे आई-वडील लखनौतच मोलमजुरी करतात. मनोरंजन गौडा हा मैसूरचा राहणारा आहे. तोही गरीब घरातील आहे. ‘माझ्या मुलाने काही चुकीचे काम केले असेल, तर त्याला फाशीच दिली पाहिजे,’ असे त्याचे वडील देवराज गौडा म्हणतात. गौडा याने मैसूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
परिवहन भवनासमोर निदर्शने करणाऱ्या नीलम आणि अनमोल शिंदे यांनीही पिवळ्या पावडरची हवेत फवारणी केली. ते दोघे पोलिसांनी पकडल्यावरही ‘भारत माता की जय,’ ‘हुकूमशाही (तानाशाही) नही चलेगी’ अशा घोषणा देत होते. यातील नीलम ही हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातल्या घोसी कला या गावातील रहिवासी आहे. दिल्लीच्या सीमांवर झालेल्या शेतकरी आंदोलनासह अनेक सामाजिक आंदोलनात ती सक्रिय सहभागी होते. ती पदवीधर असल्याचे समजते.
माजी मुख्यमंत्री यांच्या गावाचा अमोल ?
अमोल धनराज शिंदे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो पदवीधर असून तो पोलिस, सैन्य दलात भरती होण्याची तयारी करीत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी व गावातील खंडोबा मंदिरात साफसफाईचे काम करतात. त्याचा एक भाऊ मुंबईत मिस्त्रीकाम करतो. ‘मी दिल्लीला कामासाठी जाणार असल्याचे त्याने घरी सांगितले,’ अशी माहिती आहे. अमोल हा हुशार विद्यार्थी असून, पदवीधर झालेला आहे. गावातील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयातून त्याने दहावीची परीक्षा दिली. त्याला चांगले गुण मिळाले होते. म्हणून ग्रामस्थांनी त्याचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती, अशी आठवण झरीचे माजी सरपंच दयानंद सुरवसे यांनी सांगितली. त्याच्या आई-वडिलांची पोलिस चौकशी करीत असून लातूरच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबतच नांदेड येथील एटीएसचे पथकही गावात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. झरीत सध्या मोठ्या प्रमाणावर पोलिस आहेत.
रिक्षा चालकाणे इंजिनियर ला घेऊन घडवला प्रकार.
सागर शर्मा, नीलम आझाद, मनोरंजन डी, अमोल शिंदे अशी या आरोपींची नवे असून यातील काहीजण इंजिनियर, रिक्षा चालक आहे तर अमोल शिंदे हा मूळचा महाराष्ट्रातील आहे.
-
चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल.
संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर आज बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्यूहणजे एपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं ही माहिती दिली.
असीम सरोदे म्हणतात या घटनेला समर्थन नाही, पण त्या तरुणासाठी मी लढणार.
बुधवारी(१३ डिसेंबर) रोजी लोकसभेचं कामकाज सुरु असताना तरुणांनी संसदेत तसंच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. यातील एक तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्राचा असून लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावाचा आहे. दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अमोल शिंदेची कायदेशीर बाजू वकील असीम सरोदे हे लढवणार आहेत. दरम्यान,तरुणांच्या कृत्याचं समर्थन नाहीच परंतु तरुणांचं गुन्हेगारीकरण करु नये, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.
असीम सरोदे काय म्हणतात. ?
असीम सरोदे म्हणाले की, अमोल शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा उद्धेश गुन्हेगारी स्वरुपाचा नव्हता. गरिबी आणि बेरोजगारीचा मुद्दा प्राधान्याने विचारात घ्यावा, असं त्याचं मत होतं.अर्थात तरुणांचं आंदोलन समर्थनीय नाही. तरुणांनी संसदेत घुसून धुराच्या नळकांड्या फोडल्या. ही आंदोलनाची पद्धत होऊ शकत नाही. पण, त्यांचा उद्धेश कुणालाही जीवितहानी पोहचवण्याचा नव्हता, तर सरकारला जागे करण्यासाठी होता. त्या उद्देशाने तरुण संसदेत गेले असतील, तर गुन्हेगारीकरण करणारी प्रक्रिया वापरु नये.
असीम सरोदे यांनी फेसबुक वर काय लिहिलंय ?
बेरोजगार तरुणांची सरकारने शिक्षा माफ करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठी मागणी केली आहे. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरूणांची शिक्षा माफ करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला केले आहे. सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही. त्यामूळे त्या मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायाची, हे सरकारनं ठरवलं पाहिजे.असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.