TIMES OF AHMEDNAGAR
पारनेर -तालुक्यातील एका गावात खासदार नीलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे याने साथीदारांच्या मदतीने महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (६ जून) सकाळी घडली आहे.दरम्यान, घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडले. त्यांनी शुक्रवारी (७ जून) नगरमधील तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहुल झावरे सह २४ जणांविरूध्द विनयभंग, अॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
(राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचे छायाचित्र.)
महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतरच झावरेंवर हल्ला ?
गुरूवारी दुपारी राहुल झावरे यांच्यावर १५ ते १६ जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यात झावरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. झावरेंना झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जबाबावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झावरे यांनी साथीदारांसह महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतरच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.