बहाद्दूर मुख्याध्यापक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच लाच घेत होता , विद्यार्थ्याने लावला सापळा अन् मुख्याध्यापकाचा झाला कार्यक्रम …
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CAGE TALUKA | SCHOOL PRINCIPAL CAUGHT TAKING BRIBE OF 3 THOUSAND RUPEES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
केज येथे मागील आठवड्यात तहसीलदार आणि कोतवाल यांच्यावर २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ही घटना ताजी असतांना ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या दुसऱ्या प्रतीसाठी ३ हजारांची लाच घेताना केज येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शाळेच्या आवारात करण्यात आली.
(संग्रहित. स्त्रोत.सोशल मिडिया.)
शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याकडून ३ हजारांची लाच घेताना ……
केज शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज सखाराम सोनवणे (रा. सारणी आनंदगाव, ता. केज) यांनी त्यांच्या शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने १२ वी उत्तीर्ण झालेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची द्वितीय प्रतीच्या मागणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्याध्यापक धनराज सोनवणे यांनी त्यांच्याकडे ३ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्याने बीड येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आणि त्यानुसार मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. आज दुपारी लाचखोर मुख्याध्यापक हे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय केज या शाळेच्या प्रवेशद्वारावर तक्रारदार विद्यार्थ्याकडून ३ हजारांची लाच घेताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.