भाजपची सत्ता येण्यासाठी त्याने देवीला प्रार्थना केली, आणि एनडीएला बहुमत मिळताच त्याने देवीला स्वतःच्या हातांच्या बोटांचे दान दिले.
TIMES OF AHMEDNAGAR | BJP | CONGRESS | LOK SABHA ELECTION | RAHUL GANDHI | NARENDRA MODI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन बळी देत स्वत:ची बोटं दान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गेश पांडे (३०) असं या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ४ जून रोजी छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली आहे.
(संग्रहित दृश्य.)
मंदिरात जाऊन आपल्या डाव्या हाताची बोटे छाटत देवीला दान केले.
एका प्रसिद्ध प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुरुवातीला काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. इंडिया आघाडी सरकार बनवणार की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे निराश झालेल्या दुर्गेश पांडे याने गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाचा विजय व्हावा, यासाठी प्रार्थना केली होती.त्यानंतर काही तासांतच लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला, तेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले. त्यामुळे देवीने आपली प्रार्थना ऐकली, या भावनेतून दुर्गेश पांडे याने पुन्हा मंदिरात जाऊन आपल्या डाव्या हाताची बोटे छाटत देवीला दान केले.
(संग्रहित दृश्य.)
ज्यावेळी काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, त्यावेळी मला नैराश्य आले होते.
दुर्गेशने बोटं छाटताच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यावेळी स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र जखम मोठी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबिकापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याचा उपचार केला. मात्र तुटलेली बोटं जोडण्यात डॉक्टरांना यश आले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेशची प्रकृती सध्या ठीक आहे.यासंदर्भात बोलताना दुर्देश पांडे म्हणाला कि ज्यावेळी काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, त्यावेळी मला नैराश्य आले होते. त्यामुळे मी गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. संध्याकाळी जेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी पुन्हा देवीच्या मंदिरात गेलो आणि माझी बोटे छाटत मी देवीला दान दिले.