TIMES OF AHMEDNAGAR
या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध इंडिया आघाडी असा रंगतदार सामना होणार आहे. भारत जोडो यात्रेवर भर देऊन राहुल गांधींनी देश भर फिरून तरुणांना व इतर पक्षांना जोडण्याची तयारी सुरु केली आहे. तर सरकारच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजनांची जाहिरात करून सरकार जनतेच्या हिताचा असल्याचे सांगण्यात भाजपने कंबर कसली आहे.लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सगळ्यांच पक्षांकडून सुरु आहे. सध्या निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. या पत्रात १६ एप्रिल २०२४ या दिवशी लोकसभा निवडणुका घेतल्या जातील असं म्हटलं गेलं आहे. अशात १६ एप्रिल या दिवशी निवडणुका होणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.