TIMES OF AHMEDNAGAR
महायुतीत प्रवेश करण्यासाठी मनसेच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यावर वारंवार टीका करणारे मनसेचे चळवळीचे नेते नितीन भूतारे यांना आता आता पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. महायुतीत अशा कारवाईची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना ठरली आहे. मनसेचे नगरमधील डॅशिंग नेते नितीन भुतारे यांना जिल्हा सचिव पदावरून हटवले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेने ही कारवाई केली आहे.

विखेंना विरोध कायम – नितीन भूतारे.
खासदार विखेंना वारंवार टार्गेट करून भूतारेंनी विखेंचा समाचारच घेतला आहे. भूतारेंनी खासदार विखेंची काॅल रेकॉर्डिंग आना आणि एक हजारांचे बक्षिश मिळवा अशी थेट स्पर्धाच राबवली होती. बक्षिसाची ही योजना जाहीर करताना नितीन भुतारे यांनी तसे स्टीकर तयार केले होते. काही ठिकाणी स्टीकर चिटकवण्यात आले होते. या योजनेला काही काल मर्यादा घालून दिली होती. अजून तरी कोणीही बक्षिसासाठी दावा केलेला नाही. नितीन भुतारे यांनी ही बक्षिसाची योजना जाहीर केली, तेव्हा भाजप महायुतीत मनसेच्या युतीच्या चर्चादेखील नव्हती. आता चर्चा सुरू झाली असली, तरी निर्णय झालेला नाही.

खासदार विखे हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत. – भूतारे
महायुतीतील भाजपने सुरुवातीला पहिली मतदार यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील पहिल्या २० उमेदवारांमध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारीनंतर अवघ्या दोन दिवसांत मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी खासदार विखेंवर निशाणा साधला. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाने थेट खासदार विखेंशी दूरध्वनीवर संपर्क केल्याचे दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा. खासदार विखे हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या भेटीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. स्वीय सहायकांचे अडथळे खूप येतात. तरीदेखील संपर्क होईल की नाही हे सांगता येत नाही अशी टीका नितीन भुतारे यांनी केली होती.


