पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका म्हणत चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने केली आत्महत्या.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | WELFARE | A STUDENT GOING TO IDEAL SCHOOL ENDED HIS LIFE ON SUNDAY.| PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कल्याण – कल्याण पूर्व भागात असलेल्या आयडियल शाळेतील एका विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. शाळेतल्या एका शिक्षिकेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललं असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो (वय १२) असं या मुलाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी विघ्नेशने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्याने भावनिक ओळी लिहिल्या आहेत तसंच शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने चिठ्ठीत म्हटलं आहे.
(संग्रहित दृश्य)
मात्र रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर खूप झाला.
विघ्नेश पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात राहत होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने राहत्या घरात गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उघडून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह त्यांना दिसला. वडील घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हे दृश्य पाहून वडिलांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर खूप झाला होता.
(संग्रहित दृश्य)
शिक्षिका आणि मुलाने चिडवल्याने मी आत्महत्या करत आहे.
विघ्नेश पात्रोच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.विघ्नेश पात्रो याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शाळेतील एका शिक्षिकेचा आणि मुलाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्याने म्हटले होते की पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडवल्याने मी आत्महत्या करत आहे असे विघ्नेशने चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
(संग्रहित दृश्य)
पालक वर्गाची तीव्र नापसंती.
एका राजकीय व्यक्तिशी संबंधित ही शिक्षण संस्था आहे.कोळसेवाडी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला.कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण जवळील वरप येथे सेक्रेड हार्ट शाळेतील अनीश दळवी या विद्यार्थ्याने शाळा चालकांच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शाळेचे संचालक आल्विन ॲन्थोनी यांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली होती. अलीकडे शिक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थी आत्महत्या करू लागल्याने पालक वर्गाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.