मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते, २४ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला, पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत ५आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली.
(संग्रहित दृश्य.)
अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. सध्या जोगेश्वरी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरु केला आहे. पिडीत चिमुकलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करणार असल्याचे समजते.
(संग्रहित दृश्य.)
आळीपाळीने बलात्कार….
पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकासोबत राहते. (दि.२४) फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजयनगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी पिडीत मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर (दि.२७) फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. यावरून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो ) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे.