Namdev Shastri Reaction on Dhananjay Munde Resignation | "अजाणतेपणातून...", धनंजय मुंडे राजीनामाप्रकरणी नामदेव शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...(संग्रहित दृश्य.)

नामदेवशास्त्रींनी भूमिका काय ?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. असे वक्तव्य करणाऱ्या नामदेवशास्त्री यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. जे वक्तव्य आधी केले त्याबाबत पूर्वकल्पना आपल्याला नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी धनंजय देशमुख परिवारासह भेटण्यासाठी आले. देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला जाण करून दिली असून लोकांनीही गैरसमज करून घेऊ नये. भगवानगड देशमुख परिवाराच्या पाठीशी आहे. त्यांना जलदगतीने न्यायालयात न्याय मिळवून द्यावा.जाफराबाद तालुक्याच्या ठिकाणी (दि.५ ) बुधवारी बंद पाळण्यात आला. बंदला ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आल होते. जालना तालुक्यातील रामनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने परतूर येथील उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयावर बुधवारी उपोषण करण्यात आले.