By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सहा वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करून तिची निर्घुण हत्त्या, संतापलेल्या नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > सहा वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करून तिची निर्घुण हत्त्या, संतापलेल्या नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक…..
क्राईम न्यूज

सहा वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करून तिची निर्घुण हत्त्या, संतापलेल्या नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक…..

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | JALGAON | CRIME NEWS | A SIX-YEAR-OLD GIRL WAS RAPED AND KILLED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/21 at 12:23 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

जळगाव – सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली होती.

Jalgaon Crime 6 year old girl case mob attack stone pelting on jamner police station | Jalgaon Crime: जामनेरमध्ये सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावाची पोलीस ...स्त्रोत सोशल मिडिया 

जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ…..

या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  रुग्णालय जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही फोनवरून या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणा ,जखमी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. जामनेरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे.

बलात्काराच्या 4 घटनांनी महाराष्ट्र हादरला, पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर...स्त्रोत सोशल मिडिया 

बालिकेवर अत्त्याचार आणि हत्त्या…..

बालिकेवर अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली आहे. तोडफोड केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे. गुरुवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली आहे. काही दिवसांपूर्वी जामनेर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. काल रात्री बेकायदेशीर जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. आम्ही याप्रकरणात योग्य ती कारवाई करु, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी जमावाला केले होते. मात्र जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही दगडफेक करणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेऊ असेही अशोक नखाते यांनी सांगितले आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला फार मोठी दुखापत झालेली नाही. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मायनर फ्रॅक्चर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडू, आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू – जरांगेंचा सरकारवर निशाणा.
Next Article चोरट्यांनी नगर जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?