TIMES OF AHMEDNAGAR | KOLKATA DOCTOR MURDER | THE KOLKATA RAPE AND MURDER CASE HAS BEEN HANDED OVER TO THE CBI.| PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ ने राज्यभरात संप पुकारला आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे. या बलात्कार व हत्या प्रकरणाचं गाभीर्य पाहता, तसेच देशभरातील संतापाची लाट पाहता सरकारने हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवलं आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे. तसतशीधक्कादायक माहिती व धक्कादायक खुलासे होत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) केला.
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. आता एका डॉक्टरने दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत. अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल वाचला आहे. या शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगात १५१ मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे. असं गोस्वामी म्हणाले आहेत. तसेच ही माहिती सांगत गोस्वामी यांनी तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
(संग्रहित दृश्य.)
शवविच्छेदन अहवाल वाचून असं वाटतंय की पोलिसांचा तपास अपुरा आहे.
शवविच्छेदन अहवालातून असे संकेत मिळत आहेत की या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असावेत. डॉक्टर तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. या जखमा खोलवर झाल्या आहेत. तिच्यावर हल्ला करण्यासाठी जितकी ताकद लावली आहे ते पाहता हे एका माणसाचं काम नक्कीच नाही असे डॉ. गोस्वामी म्हणालेत. तरुणीच्या कुटुंबीयांनी अनेकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. कोलकाता पोलीस सांगतायत की या प्रकरणात एकच आरोपी सहभागी होता. मात्र शवविच्छेदन अहवाल वाचून असं वाटतंय की पोलिसांचा तपास अपुरा आहे.
(संग्रहित दृश्य.)
हत्या प्रकरणानंतरही सेमिनार हॉल खुला.
या बलात्कार व खून प्रकरणाचा तपासही संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. आंदोलक डॉक्टरांनी दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणानंतरही सेमिनार हॉल (जिथे ही घटना घडली) तो खुला ठेवण्यात आला होता. दोन दिवस हॉल खुला होता. याबाबत पोलिसांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की येथे दुरुस्तीचं काम केलं जाणार होतं. त्यामुळे हॉल खुला ठेवलेला होता. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की दुरुस्तीचं काम सेमिनार हॉलमध्ये नव्हे तर सेमिनार हॉलच्या बाजूच्या खोलीत केलं जाणार होतं. तसेच इतक्या मोठ्या सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील नव्हता. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.