TIMES OF AHMEDNAGAR
पुणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून अपघातांचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. देशभर गाजलेल्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजे असताना अशाच प्रकारच्या आणखी मोठ्या घटना समोर आल्या आहेत. तर यातील एका घटनेत पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने एका तरुणाचा जीव घेतला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मद्य पिवून पुणे महानगरपालिकेच्या डंपर चालकाने महिलेच्या दुचाकिला दिली धडक.
तळेगांव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी तळेगाव येथे दोन गाड्यांना ठोकर मारत अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घरी जाऊन बसलेल्या पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाटील यांनी मद्य प्राशन केल्याचा अंदाज आहे. आपली खाजगी गाडी बेभान चालवून त्यांनी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाड्यांना ठोकर मारल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी १ जून सायंकाळी पाचच्या सुमारास शांताई सिटी सेंटरसमोर घडली आहे. दरम्यान मुख्याधिका-यांनी मद्यपान केल्याचा आरोप असून त्यांना रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु समोरील दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुसरी घटना ही पुणे शहरातूनच समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरने एका महिलेच्या दुचाकिला मद्य (दारू) पेऊन जोराची धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा सोशल मीडियावर व्हीडिओ देखील व्हायरल झाला आहे. सुदैवाने यान कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलीस पाटलाच्या मुलीने मालवाहू पिकअपने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू….
हिट अँड रन प्रकरणाची तिसरी घटना ग्रामीण भागात घडली असून, शिरुर तालुक्यात ही घटना घडली आहे. ह्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलगी चालवत असलेल्या मालवाहू पिकअपने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की पिकअपने दुचाकीला २० ते ३० फूट फरफटत नेले आहे. ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबबात मिळालेली माहिती अशी की, पोलीस पाटलाच्या १५ वर्षीय मुलीने मालवाहू पिकअप चालवला होता. यावेळी तिच्या शेजारी वडील बसले होते. तिने दुचाकीवरून जाणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अरुण मेमाणे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महिंद्र बांडे हा जखमी झाला आहे. पिकअप क्रमांक एम एच १२ एस एफ ३४३९ अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवला होता. रस्त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर तिने २० ते ३० फूट दूर दुचाकी फरफटत नेली आहे.