भाग – ०२
TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – जिल्ह्यात गुन्हेगारांवर सध्या पोलिसांचा धाक राहिला नाही. वाढती गुन्हेगारी त्याचे उत्तम उदाहरण आहे. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीचा कल हा अवैध धंद्यांपासून सुरु होतो. त्यामुळे अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळल्यास शहरातील व जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होऊ शकते. मात्र प्रशासन अवैध धंदे चालकांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याने अवैध धंदे चालकांची उदमात सुरूच आहे.
तालुका पोलिसांना गाढ झोप ?
टाईम्स ऑफ अहमदनगरला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शनिवार ०९ मार्च रोजी शिरढोण येथील नदीत देशी-विदेशी दारूची विक्री , आरणगाव येथील वेश्याव्यवसाय आणि अवैध दारू विक्री , रुईछत्तीशी येथील अवैध कारभार या बाबत बातमी प्रसिद्ध झाली. या घटना अत्यंत गंभीर आहेत अवैध धंदे चालकांनी अवैध धंद्यांच्या जोरावर दहशत माजवली आहे. मात्र तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या अवैध कारभारावर अद्यापही तालुका पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तालुका हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर तालुका पोलीस का कारवाई करत नाही ? असा संशयास्पद प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे कारभारी म्हणून प्रल्हाद गीते यांचे भूमिकेकडे शहराचे लक्ष लागून आहे.
अधिकारी कारवाई कधी करणार,प्रशासनाला आता तरी सापडेल का तो कमल्या. ?
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांना उत आला आहे. बेकायदेशीर दारू विक्री वाढली आहे. मद्याचे सेवनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरत असतात. मात्र तालुका पोलिसांना कोणाच्याही कुटुंबाची चिंता नसल्याचे अवैध धंद्यांच्या सूळसुळाटावरून एकंदरीत दिसत आहे. या अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालत आहे असा सवाल नागरिकांना विचारल्यास कमल्या नामक व्यक्ती या धंद्यांमध्ये सहभागी असल्याचे नागरिकांनी घासगीत सांगितले. मात्र या कमल्याला शोधणे स्थानिक पोलिसांसाठी अत्यंत चुरशीचे काम असल्याने अप्पर पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भाग – ०३