महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्याबद्दल आणि सिटींग जागा बदलांबाबत अजित पवार म्हणाले कि….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA GOVERNMENT | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | LEGISLATIVE ASSEMBLY ELECTIONS | NATIONALIST CONGRESS PARTY (AJIT PAWAR GROUP)| THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीतनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीला सामोरं जाण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.महायुती किंवामहाविकास आघाडी यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. तरीही आघाडी आणि युतीनी विजयाचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. अशात जागावाटपाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे.
(संग्रहित दृश्य)
अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिमधून आज जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना, बहिणींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत असं अजित पवार म्हणाले आहे.
(संग्रहित दृश्य)
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला….
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटते ते ती भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. काही निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाहीत. काही निर्णय हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाहीत. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळाले पाहिजे. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
(संग्रहित दृश्य)
जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर……
महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की आमच्या तीनही पक्षांकडे (महायुती) ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल असं पवार यांनी म्हटलं आहे.