महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) राज्यप्रमुख पदी संध्या सोनवणे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वतीने करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले आहे. संध्या सोनवणे यांच्या कार्याची दखल घेत व जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.