बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती.धाराशिव जिल्ह्यातही आता संतोष देशमुख प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली.धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे १८ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत शिवारात फेकण्यात आले. ७ ते ८ जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माऊली गिरी नावाचा तरुण घरी एकटा असताना त्याला ७ ते ८ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड अन् काठीने अमानुष मारहाण केली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. तरुणाला पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण झाली आहे. त्याच्या गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती समोर येत आहे.
(संग्रहित दृश्य.)
६ जणांविरोधात गुन्हा दाखल…
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणात सतीश जगताप याच्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ३ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ज्या पद्धतीने ही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.