भारतीय वंशाच्या टेक उद्योजकाची वैयक्तिक आयुष्यातील एका वादामुळे चांगलीच चर्चा आहे. १० अब्ज डॉलर्सच्या कंपनीचा मालक असणाऱ्या एचआर कंपनी रीप्लिंग संस्थापक असणारा प्रसन्न शंकर या टेक उद्योजकाने याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधावरून सोशल माध्यमावर पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर आता त्यांच्या पत्नीनेही प्रसन्न शंकरच्या आरोपांवर भाष्य करत उत्तर देत त्याच्यावर मोठे आरोप केले आहेत. स्वत: प्रसन्नचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने पत्नीला ओपन मॅरेज करायला भाग पाडले असा खळबळजनक दावा पत्नीने न्यायालयात केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार प्रसन्न शंकरची पत्नी दिव्याने दावा केला आहे. तिच्या पतीने प्रसन्नने तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्याने अनेकदा वेश्यांसोबत संबंध ठेवले होते तिच्यावर नजर ठेवली होती आणि तिचं रेकॉर्डिंगही केलं होतं. त्याने बाथरूम देखील सोडलं नाही. दिव्याने आरोप केला की प्रसन्न तिला आणि तिच्या मुलाला वेगवेगळ्या देशांमध्ये घेऊन जात राहिला जेणेकरून तो त्याचा कर वाचवू शकेल. दिव्याने आपला पती प्रसन्न शंकरबाबत आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. तो म्हणजे प्रसन्नने प्रसूतीनंतरही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तेव्हा तिला शारीरिक वेदना होत होत्या तरीही प्रसन्नने तिच्यासोबत संबंध ठेवले. प्रसन्न म्हणायचे की शरीर सुख ही त्यांची मूलभूत गरज आहे. मी कितीही वेदनेत असले तरी मला ते करावेच लागत असे. नाहीतर ते बाहेर दुसरीकडे जातील असंही दिव्याने सांगितलं आहे. प्रसन्न शंकर या उद्योजकाच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असा आरोप केला होता की त्यांच्या पत्नीचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. हे त्यांच्या पत्नीला कळताच पत्नीने घरगुती हिंसाचार आणि छळाचा त्यांच्यावर आरोप केला. पत्नीने प्रसन्न शंकर यांच्याविरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. प्रसन्नच्या पत्नीने भारताऐवजी अमेरिकेत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. प्रसन्न म्हणाले त्यांच्या पत्नीने त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाला लपवून ठेवले. या कारणास्तव त्यांनी पत्नीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर अमेरिकन न्यायालयाने प्रसन्न यांच्या बाजूने निकाल दिला.