२०२३ संपण्याआधी खान कुटुंबात सनईचौघडे वाजले. अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला.५६ वर्षीय अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. या निकाहला खान कुटुंबीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र अरबाज-शुराच्या निकाहमधील एक गोष्ट नेटकऱ्यांना खूप खटकली. त्यावरू या दोघांना ट्रोल केलं जातंय. अरबाजने त्याच्या निकाहमध्ये मुस्लीम धर्माचे अनेक नियम मोडले, असा आरोप काहींनी केला आहे.
मुस्लीम पद्धतीच्या निकाहमध्ये वर-वधूदरम्यान पडदा असतो. निकाह पार पडल्यानंतरच तो पडदा हटवला जातो आणि वर-वधूला एकमेकांचा चेहरा दाखवला जातो. मात्र अरबाज आणि शुरा यांच्या निकाहच्या वेळी एकमेकांसोबतच कोणत्याही पडद्याशिवाय दिसले. इतकंच नव्हे तर एका फोटोमध्ये शुरा निकाहच्या वेळी अरबाजच्या मिठीत पहायला मिळाली. त्यावरून काहींनी आक्षेप घेतला आहे. शुराने लग्नात डीप नेक क्रॉप ब्लाऊज आणि लेहंगा परिधान केला होता. तिच्या या कपड्यांवरूनही ट्रोल केलं जातंय. निकाहच्या वेळी वधूने तोकडे कपडे परिधान करू नये, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
लग्नाच्या आधी जेव्हा शुरा कारमधून अर्पिता खानच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने हिजाब परिधान केला होता. त्यामुळे अरबाजसोबत ती निकाह करताना मुस्लीम धर्माचे सर्व नियम पाळणार, असा अंदाज नेटकऱ्यांना होता. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये वेगळंच चित्र दिसल्याने काहीजण भडकले आहेत. इतकंच नव्हे तर अरबाज आणि त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानने वडिलांच्या लग्नात नाचणं आणि गाणंसुद्धा काहींना आवडलं नाही.
सिंपल लूकमध्ये सलमान.
अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नात सलमान खान अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खानने कुर्ता-पायजमा घातलेला दिसत होता. सलमान खानचा हा साधा लूक सोशल मीडियावर येताच लोकप्रिय झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर येताना दिसत आहे. यावेळी सलमान खानसोबत मोठा सुरक्षा ताफाही दिसला. सलमान खानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.
लग्नाबद्दल चाहत्यांचा सलमानला सवाल
सलमान खानच्या या व्हिडिओवर लोकांनी विवध कमेंट केल्या आहेत. त्याचे कौतुक करतानाच, लोकांनी त्याला लग्नाबद्दलही सवाल विचारले आहेत.अरबाज खानने दुसरे लग्न केले आहे, भाईजना, तू पहिलं लग्न कधी करणार ?’ असा सवाल एका युजरने केला तर दुसऱ्या यूजरने लिहिले की आता तुलाही लग्न करावसं वाटत असेल. याशिवाय अनेक यूजर्स सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताना दिसले.
अरबाजची पत्नी शुरा खान कोण आहे ?
मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत होता. तो गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र आमचं ब्रेकअप झालं असा खुलासा काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत केला. त्यानंतर अचानक आता अरबाज आणि शुराच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि २४ डिसेंबरला त्यांनी लग्न केलं. पटना शुक्ला या नव्या चित्रपटाच्या सेटवर अरबाज खानची ओळख मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी झाली. शुरा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरी अरबाज आणि शूरा यांचा निकाह पार पडला. निकाहसाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. रविना टंडन, तिची लेक राशा , रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा यांच्यासह अनेकजण नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना पॉवर कपल मानलं जायचं. नव्वदच्या दशकात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. तब्बल १९ वर्षांच्या संसारानंतर ही जोडी विभक्त झाली. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा २१ वर्षांचा मुलगा आहे. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. त्यामुळे पुन्हा एकदा अरबाज आणि मलायकाच्या नात्याची चर्चा रंगली आहे. मलायका आणि अरबाज हे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी जोडी होती. त्यामुळे या दोघांचा घटस्फोटसुद्धा तितकाच चर्चेत होता. हे दोघं का विभक्त होत आहेत, घटस्फोटानंतर मलायकाने अरबाजकडे किती पोटगी मागितली, असे प्रश्न अनेकांना पडले होते. २०१६ मध्ये दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर २०१७ मध्ये अखेर दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले.