मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तुमची प्रॉपर्टी नाहीय ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे. असं राज ठाकरेंनी ठणकावलं होतं. यावर आता एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कोणाची आहे हे लोकांनी ठरवलंय. धनुष्यबाण कोणाचं आहे हे देखील ठरवलं आहे. बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांची शिवसेना गहाण ठेवलेली, जी आम्ही वाचवली नसती तर काँग्रेसने विकून टाकली असती. धनुष्यबाण हे चिन्हं बाळासाहेब ठाकरेंचं आहे. त्यांनी कमावलं आहे. परंतु आम्ही ते जिवापाड जपलं आहे. त्यासाठी आम्ही सत्ता सोडली. ८-१० मंत्र्यांनी सत्ता सोडली आहे. ५० आमदारांनी सत्ता सोडली आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.