भाजप लोकशाहीवर हल्ला करत आहे. कॉंग्रेस पक्षाचे देशभरात निदर्शने.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | NEW DELHI | BJP | CONGRESS | RAHUL GANDHI | NARENDRA MODI | SONIA GANDHI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाला १,८२३ कोटी रुपयांचा कर व दंड भरण्यासाठी नोटीस पाठविल्याने शनिवारी देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपवर ‘कर दहशवादी’ असा आरोप करून भाजप सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला. दिल्लीमध्ये ‘युवा काँग्रेस’चे नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केले. केंद्र सरकार काँग्रेसला निरनिराळया मार्गानी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आमचा पक्ष त्याला घाबरत नसल्याचे ‘युवा काँग्रेस’चे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी स्पष्ट केले. कर नियमांच्या खाली काँग्रेसला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
देशभरातील अनेक शहरांतील कॉंग्रेस कार्यालयांबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा जोरदार निषेध करत ‘लोकशाही वाचवा’ अशी घोषणा दिली. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष वरचढ ठरू नये यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सांगण्यावरून काँग्रेसला नोटिसा पाठवल्या जात आहेत. मुक्त व निष्पक्ष निवडणुका होऊ नयेत म्हणून प्राप्तिकर विभाग जाणूनबुजून हे करत आहेत. असा आरोप छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एच. एस. लकी यांनी केला. काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे हे गुवाहाटी येथे काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले. आम्हाला रस्त्यावर आंदोलनाची परवानगी न मिळाल्यामुळे त्यामुळे आम्हाला पक्ष कार्यालयात निदर्शने करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांना रस्त्यावर आंदोलन करू न देऊन भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप साठे यांनी केला.