TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | OFFICE OF THE DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | LOCAL CRIME BRANCH | MARIJUANA TRAFFICKING | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त झाल्यास जास्त वावगे ठरणार नाही. त्याला कारणे देखील भरपूर आहेत. शहरात अवैध धंद्यांच्या साम्राज्याने शहराला पिंजून काढले आहे. अवैध धंद्यांच्या चालकांची तर दहशत वाढतच चालली आहे. मात्र प्रशासन हवी तशी कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे बोलले जाते.
अवैध धंद्यांचे साम्राज्य हे शहरापुरते मर्यादित नसून याचे जाळे संपूर्ण जिल्हाभर पसरले आहे. काही कर्मचारी देखील या अवैध धंद्यांना सहकार्य करत आहे तर काही या धंद्यांमध्ये पार्टनर असल्याचे समजते. प्रशासनातल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप असतांना देखील वरिष्ठ त्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने तक्रारदार देखील प्रशासापासून लांब असल्याच्या चर्चांना उधान येत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
प्रशासनाच्या एका पथकाने काल २६ मार्च रोजी जिल्ह्यातील एका गावात छापा टाकला या छाप्यात काही लोकांना अटक करण्यात आली. या आरोपींकडे गांजा आढळून आला. ढाकणे व थोरात नामक काही ठेकेदारांनी या प्रकरणात तडजोड करून छातूरमातुर कारवाई दाखवण्याचे आश्वासन आणि तब्बल पाच-सहा तास परिश्रम करून या ठेकादारांनी लाखो रुपयांच्या तडजोडी केली आणि काही आरोपींना सोडून दिले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.