महापालिका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी फलकावर नाव नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट ) पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या महापौर प्रतिभा चौधरी यांना जाब विचारला. धुळ्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावर सांगितल्यानुसार नाव घेण्यात आले नाही. फलकावरील नावावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट ) पदाधिकारी, माजी नगरसेवक व सत्ताधारी भाजपच्या महापौर व नगरसेवकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कार्यक्रमाचा निषेध.
महापालिकेच्या रुग्णालयाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले असून, या वादामध्ये खासदार सुभाष भामरे यांनी मध्यस्थी करत हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला आहे. माजी नगरसेवक कैलास चौधरी यांना या कार्यक्रमातून डावलून कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना देण्यात आले नाही त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचा निषेध केला आहे.